चिंचोली — नाशिक जिल्ह्यातील कृषीप्रधान गाव

चिंचोली गाव हे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. गावात शाळा, रस्ते आणि डिजिटल सुविधा उपलब्ध असून लोक एकत्र येऊन गावाच्या प्रगतीसाठी काम करतात.

अधिक वाचा

गावाचा परिचय

चिंचोली हे गाव भौगोलिक दृष्ट्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले असुन गुडुंबा नदीचे उगमस्थान आहे . गावातील ९५% लोकांचा शेती व दुग्धव्यवसाय आहे. गाव नाशिक शहरापासून ११ किमी नाशिक-पूने हायवे लगत आहे. गावाला तंटामुक्त पुरस्कार व आर.आर आबा सुंदरगाव पुरस्कार प्राप्त आहे. जिल्हापरिषद शाळा ISO/ युनेस्को दर्जा प्राप्त आहे. गावची लोकसंख्या २०११ प्रमाणे ३३४६ आहे. गावात दोन अभ्यासिका आहेत.

स्थान व अंतर

चिंचोली हे गाव नाशिक शहरापासून सुमारे ११ किमी अंतरावर वसलेले आहे. हे गाव सिन्नर तालुक्यात येते आणि रस्त्याने नाशिकशी जोडलेले आहे, ज्यामुळे येथील वाहतूक व संपर्क सोयीस्कर आहे.

चिंचोलीचा इतिहास

चिंचोली गाव सिन्नर तालुक्यात येते आणि प्राचीन काळापासून वस्ती असलेले गाव आहे. गावात जुनी मंदिरे व पारंपरिक सण यांमुळे सांस्कृतिक वारसा जपला गेला आहे. काळानुसार गावात शिक्षण, रस्ते आणि पाणीपुरवठा यासारख्या सुविधा विकसित झाल्या आहेत.

गावाची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या

3346

एकूण घरे

629

स्त्रियांची लोकसंख्या

1632

साक्षरता टक्केवारी

82%

लहान मुले (0-6 वर्षे)

403